छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची आणि युद्धतंत्राची आजही गरज : प्रा.डॉ.सुनील नेवे


भालोद : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याची आजच्या काळातही देशाला खूप गरज आहे. मराठ्यांचे युद्धतंत्र आजच्या काळात ही उपयोगी आहे. भारतातील महत्वपूर्ण लष्करी दल म्हणून शिवाजी महाराजांच्या सैन्याचा उल्लेख करता येईल. रणांगणाावरील पराक्रमाव्यतिरिक्त मराठे धोरणात्मक युक्ति आणि मुत्सद्दी चातुर्याचे मास्टर होते. शिवाजी महाराज हे विशेषतः मुत्सद्देगिरीला राज्यकलेचे साधन म्हणून वापरतात. 17 व्या आणि 18 व्या शतकातील मराठ्यांनी वापरलेल्या युद्धतंत्र आणि धोरणे यांचा अभ्यास आज करणे यासाठी महत्वाचे असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.सुनील नेवे यांनी केले.

मराठा सैन्याचा कणा घोडदळ
भालोद सेकंडरी एज्जुकेशन सोसायटी संचालित कला व विज्ञान महाविद्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अद्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ. किशोर कोल्हे होते. ‘मराठ्यांचे युद्धतंत्र आणि धोरणे : एक विश्लेषणात्मक अभ्यास’ या विषयावर ते बोलत होते. प्रा.सुनील नेवे पुढे म्हणाले की, मराठ्यांनी वापरलेली प्रमुख युद्ध तंत्रे आणि गनिमी कावा मराठा रणनीतीचा आधारस्तंभ होती. घोडदळ हे मराठा सैन्याचा कणा होते. भिमथडी जातीचे घोडे शिवाजी महाराजांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात होते. नाकेबंदी करून किल्ल्यांचे रक्षण आणि वेढा घालण्यात मराठे पारंगत होते. गनिमी कावा हा मराठी लष्करी नीतीचा एक प्रमुख भाग होता. मराठ्यांना असलेले भूप्रदेशाचे ज्ञान, घनदाट जंगले, उंच टेकड्या, वळणदार रस्ते, दर्‍या-खोर्‍यांची अचूक माहिती यामुळे मराठे विजयी होत गेले. हाच त्यांच्या गनिमी काव्याचा मुख्य गाभा आहे. 1869 मधील खंडेरीची लढाई ही मराठ्यांचा समावेश असलेल्या सर्वात उल्लेखनीय नौदल मोहिमेपैकी एक होती. मराठ्यांच्या राज्याचा गुप्तहेर म्हणून बहरर्जी नाईक हे होते. पण त्यांचे नाव इतिहासात फारसे नोंदवले गेले नाही.

सर्व मोहिमांमध्ये बहरर्जी नाईकांची भूमिका महत्त्वाची
छत्रपतींचा तिसरा डोळा म्हणजे बहरर्जी नाईक होय. शाईस्तेखानची बोटे कापणे, अफजलखानाचा वध सुरतेची लूट आग्य्राहून सुटका या सर्व मोहिमांमध्ये बहरर्जी नाईक यांची भूमिका महत्वाची होती. असे म्हणतात की बहरर्जी नाईक यांच्या पत्नीला ही हे माहित न्हवते की, आपला पती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा गुप्त हेर प्रमुख आहे. संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाची बाब म्हणजे इस्रायल देशामधील मोसाद नावाच्या जगातील तिसर्‍या गुप्तहेर यंत्रणामध्ये सैनिकांना जे ट्रेनिंग दिले जाते त्या पाठ्यक्रमात शिवाजी महाराज आणि बहरर्जी नाईक यांच्या युद्धतंत्राचा अभ्यास शिकायला आहे. प्राचार्य किशोर कोल्हे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शिवरायांचा कवी ना.धो. महानोर यांनी रचलेला, शिवचारित्रकार दादा नेवे यांनी स्वरबद्ध केलेला पियुषा नेवे (जळगाव) हिने गायलेला पाळणा गायला. महाविद्यालयातील प्रा.डॉ.पद्माकर सावळे, प्रा.डॉ.अजय कोल्हे, प्रा.डॉ.जतीनकुमार मेढे, प्रा.डॉ.दिनेश महाजन, प्रा.हेमंत इंगळे, प्रा.डॉ.किरण चौधरी, प्रा.काशीनाथ पाटील, प्रा.आशुतोष वर्डीकर, प्रा.राजेंद्र इंगळे, प्रा.डॉ.देवेंद्र बोंडे, प्रा.भावना प्रजापती, प्रा.शैलजा इंगळे, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


कॉपी करू नका.