धुळे पोलीस दलात फेरबदल : तीन पोलीस निरीक्षकांसह 11 अधिकार्‍यांच्या बदल्या


Dhule Police Force Reshuffle: Transfers of 11 officers including three police inspectors धुळे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एकाच लोकसभा मतदारसंघात सेवा बजावणार्‍या तीन पोलीस निरीक्षकांसह एकूण 11 पोलीस अधिकार्‍यांच्या जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी शनिवार, 24 फेब्रुवारी रोजी बदल्या केल्या आहेत. बदली झालेल्या अधिकार्‍यांनी तातडीने नवीन बदली स्थळी हजर होवून पदभार घ्यावा, असे बदली आदेशात नमूद आहे

असे आहेत बदली झालेले पोलीस निरीक्षक
आझादनगर पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांची थाळनेर प्रभारी तर साक्री पोलीस ठाण्याचे निवृत्ती पवार यांची आझाद नगर पोलीस ठाण्यात तर पश्चिम देवपूरचे हर्षवर्धन गवळी यांची साक्री पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली.

पाच सहाय्यक निरीक्षकांसह तीन उपनिरीक्षकांच्या बदल्या
देवपूरचे सहाय्यक निरीक्षक शकील रशीद शेख यांची शिरपूर तालुका, पिंपळनेरचे जयेश खलाणे यांची सोनगीर पोलीस ठाणे, सोनगीरचे सचिन कापडणीस यांची पिंपळनेर पोलीस ठाणे, थाळनेरचे दीपक पावरा यांची धुळे नियंत्रण कक्ष, धुळे शहरचे सचिन शिरसाठ यांची पश्चिम देवपूर पोलीस ठाणे प्रभारी, शिरपूर तालुक्याचे उपनिरीक्षक प्रदीप सोनवणे यांची जिविशा, धुळे तर सोनगीरचे उपनिरीक्षक विजय चौरे यांची पिंपळनेर पोलीस ठाणे व पिंपळनेरचे उपनिरीक्षक अमित माळी यांची धुळे स्थानिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे.


कॉपी करू नका.