यावलला 28 रोजी चार ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाकरीता महिला आरक्षण सोडत


On 28th of Yaval, women’s reservation for the post of Sarpanch of four Gram Panchayats will be abandoned यावल : यावल तालुक्यातील पेसा अंतर्गत चार ग्रामपंचायती आहे. या चार ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाकरीता महिला आरक्षण सोडत बुधवार, 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयात विशेष सभेद्वारे काढण्यात येणार आहे.

28 रोजी आरक्षण सोडत
यावल तालुक्यात मालोद, परसाडे बुद्रुक, गाडर्‍या, बोरखेडा खुर्द ही चार गावे असून चौघे गाव पेसा क्षेत्रातील असून या गावातील सर्व सरपंच पद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहेत. चार ग्रामपंचायतीमध्ये 50 टक्के महिलांना आरक्षण दिले जाणार आहे. चार ग्रामपंचायतीपैकी दोन ग्रामपंचायतीत महिला आरक्षण साठीची सोडत बुधवार, 28 फेब्रुवारी रोजी यावल तहसील कार्यालयामध्ये काढली जाणार आहे. सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी देवयानी यादव, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे आरक्षण काढले जाईल.


कॉपी करू नका.