रावेर येथे तुफान हास्य कल्लोळात रंगला न्यू होम मिनिस्टर खेळ

शेतकरी कुटुंबातील महिलेला लकी ड्रॉ मध्ये मिळाली ई बाईक


The New Home Minister’s game was a whirlwind of laughter at Raver रावेर : जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती तथा समाजसेवक श्रीराम पाटील मित्र परिवारातर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून खेळ पैठणीचा व लकी कूपन द्वारे सिका ई मोटर्स कंपनीची ई स्कूटर जिंकण्याचा कार्यक्रम रावेरातील छोरीया मार्केटमागील हेमंत नाईक यांच्या प्लॉटमध्ये झाला. महिला मोठ्या संख्येने सहभाग झाल्या.

तळ्यात-मळ्यात खेळाला प्रतिसाद
यात सुरुवातीला माँ साहेब जिजाऊ, माता अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन भाजपा उपजिल्हाध्यक्ष पद्माकर महाजन, जि.प.च्या माजी अध्यक्षा रंजना पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, दर्जी फाऊंडेशनचे प्रा.गोपाल दर्जी, माजी नगराध्यक्ष शीतल पाटील, आशा पाटील, योगीता पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. खेळ पैठणीचा कार्यक्रमात सुरुवातीला तळ्यात-मळ्यात हा महिलांचा लोकप्रिय खेळ खेळण्यात आला. यावेळी महिलांनी उखाणे घेत हास्यकल्लोळ केला. नंतर गाणे ओळखा ? आयोजकाचे प्रश्न मंजूषा, बकेट बॉल, फुगे फुकण यासह नृत्य फुगडी या सारखे पारंपरिक खेळ करण्यात आले. या खेळात विजय महिलांना 25 नग पैठणी, 25 नग नथनी सह 150 उत्तेजनार्थ बक्षीस बक्षीस क्रांतीनाना माळेगावकर व ह्याद्री माळेगावकर, श्रीराम पाटील यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.

यांना मिळाले बक्षीस
या खेळात टीव्ही प्रथम बक्षीस व होम मिनिस्टर खेळाचा बहुमानश्वेता सागर पाटील (रा.रावेर) यांनी पटकावला. द्वितीय बक्षीस पीठ गिरणी दिव्या राहुल महाजन (रा.रावेर) तर तृतीय बक्षीस गॅस शेगडी पूनम निलेश सांगळे (रा.भोर) व चतुर्थ बक्षीस मिक्सर स्वाती धीरज पाटील (रा.पूनखेडा), पाचवे बक्षीस इस्त्री रुपाली मनोज बावस्कर (रावेर), सिका ई मोटर्सची ई बाईक लकी कुपनद्वारा अहिरवाडी येथील रुपाली भरत महाजन यांना मिळाली.

यांनी घेतले परिश्रम
सूत्रसंचालन प्रशांत वाघ तर आभार प्रमोद पाटील यांनी मानले. बक्षीस लेखा परीक्षणाचे काम निलेश पाटील, प्रा.पंकज पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वप्नील पाटील, शीतल पाटील, राजेंद्र चौधरी, प्रशांत पाटील, घनश्याम पाटील, सुरज कोलते, संजय पुनतकर, योगेश कोळी यांनी परिश्रम घेतले.


कॉपी करू नका.