भुसावळातील खान्देश नाट्य महोत्सवात दर्जेदार नाटकांची रसिकांना विनामूल्य मेजवानी : अनिल कोष्टी


Khandesh Theater Festival in Bhusawal : Free feast for fans of quality plays : Anil Koshti भुसावळ : शहरातील उत्कर्ष कलाविष्कारतर्फे आगामी 1 मार्चपासून आयोजित करण्यात आलेल्या 14 व्या खान्देश नाट्य महोत्सवात सात दर्जेदार नाटकांची रसिकांना विनामूल्य मेजवानी मिळणार आहे. या महोत्सव अंतर्गत सोमवार, 26 ‘शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल’ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती उत्कर्ष कलाविष्कारचे अध्यक्ष अनिल कोष्टी यांनी रविवारी दुपारी पत्रकार परीषदेत दिली.

श्रीकृष्णचंद्र सभागृहात कार्यक्रम
कोष्टी म्हणाले की, 2010 पासून नानासाहेब देविदास फालक स्मृती खान्देश नाट्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. आतापर्यंत 80 नाटकांचे सादरीकरण करण्यात आले असून मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक व कल्याण येथील कलावंतांनी नाटक सादर केली आहेत. यंदा ओबेनॉल फाऊंडेशन प्रस्तुत हा महोत्सव 1ते 3 मार्च असा तीन दिवस श्रीकृष्णचंद्र सभागृहात होणार आहे. महोत्सव परीसराला नाटककार नाटककार राहुल बनसोडे नाट्य परिसर नाव देण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी साडे दहा वाजता ओबेनॉल केमिकल प्रा.लि.चे संचालक अश्विनीकुमार परदेशी यांच्याहस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल.

अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक असतील. आमदार संजय सावकारे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, महेश फालक, सुरेश पाटील, सुनील जैन, विलास चौधरी, डॉ.विनायक महाजन पंडितराव सुरवाडे, महेंद्र मांडे, प्रमोद धनकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.

दर्जेदार नाटकांचे सादरीकरण
पहिल्या सत्रात घाटे स्कूलचे विद्यार्थी ‘वारी’ हे बालनाट्य, उत्कर्ष कलाविष्कारचे ‘सेल नसलेला रेडिओ ’ ही एकांकिका सादर होईल तर सायंकाळच्या सत्रात पुणे येथील आजकल या संस्थेचे ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ व नाशिकच्या सपान या संस्थेचे ‘तो राजहंस एक’ हे नाटक सादर होईल. दुसर्‍या व तिसर्‍या दिवशी देखील दर्जेदार नाटकांची मेजवानी असेल. ही नाटके रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे. महोत्सवात जिल्ह्यातील दहा नामवंत छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व नाट्य परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कोष्टी यांनी दिली. पत्रकार परीषदेला सुशील पाटील, प्रा.विलास सोळुंके, राजपालसिंग राजपूत उपस्थित होते.

आज शॉर्ट फिल्म फेस्टिवल
शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे उद्घाटन सोमवारी सायंकाळी सहा वाजता नाहाटा महाविद्यालयातील ग्रंथालय विभागात ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक यांच्याहस्ते होईल. यावेळी ओबेनॉल केमिकल प्रायव्हेट लिमिटेडचे अश्विनकुमार परदेशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील.


कॉपी करू नका.