गिरणा पात्रातून अवैधरीत्या वाळूचे उत्खनन : दिड कोटींच्या मुद्देमालासह भडगावातील सात संशयित पोलिसांच्या जाळ्यात


Illegal extraction of sand from mill pot : Seven suspects in Bhadgaon police net with goods worth half a crore भडगाव : अवैधरीत्या जेसीबीद्वारे गिरणा पात्रातून वाळू उत्खनन करणार्‍या सात संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडील पाच डंपर, पाच स्वराज कंपनीचे ट्रॅक्टर, दोन जेसीबी दिड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सात संशयितांविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भडगाव तालुक्यातील गिरणा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकार्‍यांच्या पथकाला मिळाल्यानंतर भडगाव पोलिसांच्या पथकाने भडगाव गिरणा नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या ठिकाणावर रविवार, 25 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री छापा टाकला. याप्रकरणी संदीप मुरलीधर पाटील (41, वडगाव सतीचे, ता.भडगाव), अक्षय देवीदास मालचे (20), प्रवीण विजय मोरे (20), मच्छिंद्र गिरधर ठाकरे (21), ललित रामा जाधव (22), शुभम सुनील भील (21), रणजीत भास्कर पाटील, रवी पंचर, गणेश मराठे आणि भोला गंजे (सर्व रा.भडगाव) यांच्या विरोधात कॉन्स्टेबल राहुल महाजन यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.