यावल शहरातील अलाउद्दीन नगरात जुगार अड्ड्यावर छापा : सहा जुगारी जाळ्यात


Gambling den raided at Alauddin Nagar in Yawal City : Six gamblers caught in the net यावल : यावल शहरातील विस्तारित भागातील अलाउद्दीन नगरामध्ये एका मोकळ्या जागेवर जुगार अड्डा सुरू होता. या ठिकाणी पोलिसांच्या पथकाने छापा टाकला व येथून सहा जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून रोख रक्कम मोटरसायकलसह एक लाख 68 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सहा जुगार्‍यांवर कारवाई
यावल शहरातील विस्तारीत भागातील अलाउद्दीन नगरात एका मोकळ्या जागेवर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने छापेमारी करीत हुसेन पटेल, मुस्ताक पटेल, साजीद पटेल, कुरबान पटेल व अल्ताफ पटेल या सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य तसेच मोटरसायकल, मोबाईल असा एकूण एक लाख 68 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहा जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात हवालदार सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून मुंबई जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.


कॉपी करू नका.