डांभूर्णी शेत-शिवारातून राज्य विद्युत वितरण कंपनीचे 78 हजारांचे तार चोरीला


State Electricity Distribution Company’s wire worth 78,000 was stolen from Dambhurni Shet-Shiwar यावल : यावल तालुक्यातील डांभूर्णी शेत-शिवारातून अज्ञात चोरट्यांनी 20 खांबावरील लघू दाबाच्या विद्युत तारेची चोरी केली. तब्बल चार हजार 800 मीटर लांबीचे व 78 हजार 240 रुपये किंमतीचे हे तार होते. यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांनी वीज तार लांबवले
डांभूर्णी, ता.यावल या शेत-शिवारात मिलिंद देवराम नेहेते यांचे शेत गट क्रमांक 153 मध्ये राज्य विद्युत वितरण कंपनीचे ट्रान्सफार्मर आहे. या ट्रान्सफार्मरपासून ते मनोज रवींद्र महाजन यांच्या शेतापर्यंत एकूण 12 खांब आहेत आणि लक्ष्मण जनार्दन महाजन ते रमेश पुरुषोत्तम भंगाळे यांच्या शेतापर्यंत आठ खांब आहेत असे एकूण वीस खांबावर लघू दाबाचे तार टाकण्यात आले होते. जे मध्यरात्रीनंतर चोरी झाले. एकूण 78 हजार 240 रुपये किंमतीचे चार हजार 800 मीटर लांबीचे हे विद्युत लघूदाबाचे तार चोरी केल्याप्रकरणी राज्य विद्युत वितरण कंपनीचे प्रधान तंत्रज्ञ इकबाल तडवी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले करीत आहे.


कॉपी करू नका.