जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त पूरग्रस्तांना मदतीचा हात


भुसावळ फोटोग्राफर असोसिएशनचा आदर्श उपक्रम

भुसावळ : जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधून भुसावळ फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने शहरातील विश्वकर्मा मंदिरात सामूहिक कॅमेरा पूजन करण्यात आले. प्रसंगी पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मदत निधी संकलनाला सुरुवात झाली. अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष रमण भोळे, माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, भुसावळ फोटोग्राफर असोसिएशन अध्यक्ष आनंद ठाकरे, उपाध्यक्ष बबलू बर्‍हाटे, देवसिंग पाटील व ज्येष्ठ तथा युवा छायाचित्रकारांची उपस्थिती होती.

छायाचित्रकारांच्या पाठीशी -आमदार
आमदार संजय सावकारे यांनी छायाचित्रकारांना शासकीय तसेच निमशासकीय मदत लागल्यास सदैव त्यासाठी पाठीशी असल्याचे सांगत पुरातन कालीन फोटोग्राफी आणि आजच्या काळात फोटोग्राफी क्षेत्रात झालेला आमुलाग्र बदलाची माहिती देत टेक्नॉलॉजी जितकी सुलभ आणि सोपी आहे तितकीच घातक असल्याचे सांगितले. सकारात्मक दृष्टीकोन असल्यास निश्चित तुमची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

असोसिएशनने निर्माण केला आदर्श -नगराध्यक्ष
नगराध्यक्ष रमण भाऊ भोळे म्हणाले की, भुसावळ फोटोग्राफर असोसिएशनने सामाजिक भान ठेवून इतर कार्यक्रम रद्द करून त्या बदल्यात सर्व निधी कोल्हापूरातील पूरग्रस्त नागरीकांना देण्याचे ठरवल्याने असोसिएशन आदर्श असलचे सांगितले. भुसावळ फोटोग्राफर असोशियन च्या प्रगती व विस्तारासाठी नगरपालिकेनेमार्फत सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले.

मदतनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार
छायाचित्रकार संघटनेच्यावतीने आपापल्या परीने खारीचा वाटा उचलून मदत निधी गोळा करण्याचे कार्यास सोमवारी सुरुवात झाली. प्रसंगी आमदार संजय सावकारे यांनी पाच हजार रुपयाची मदत बॉक्समध्ये टाकली. मंगळवारपर्यंत निधीचे संकलन केले जाणार असून नंतर हा जमलेला निधी मुख्यमंत्री निधीमध्ये जमा करणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष आनंद ठाकरे म्हणाले. उपस्थित पत्रकार बांधवांना सर्पमित्र कांबळे यांनी सर्प व त्यांच्या जाती विविध जाती संदर्भात माहिती दिली.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनचे अध्यक्ष आनंद ठाकरे, उपाध्यक्ष बबलू बर्‍हाटे, सचिव राहुल पाटील, सहसचिव राजीव भंगाळे, कोषाध्यक्ष अजय शिंपी, कमिटी मेंबर निलेश कोलटकर, अतुल शिंदे, अविनाश तडस, महेंद्र बार्‍हे, विनोद गोरधे, कमलेश चौधरी, श्याम गोविंदा, सचिन काकडे, विश्‍वजीत घुले, विवेक वणीकर, कलीम पायलट, सतीश कांबळे, देवसिंग पाटील, योगेश उबाळे, विनोद ठाकरे, मुकेश नेवे, सारंग केर्‍हाळकर, विलास साळी व सर्व असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले. दरम्यान, मंगळवार, 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता सर्व छायाचित्रकार बांधवांचा स्टार रीसॉर्ट सिनेमा येथे फॅमिली गेट-टुगेदर व मनोरंजन कार्यक्रम होणार आहे. शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.


कॉपी करू नका.