चोपडा तालुक्यात 44 लाखांचा ओला गांजा जप्त : एका आरोपीला अटक

Wet ganja worth 44 lakh seized in Chopda taluka: One accused arrested जळगाव : स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीवरून चोपडा तालुक्यातील मेलाणे येथे गांजा शेतीवर कारवाई करीत तब्बल 44 लाखांचा गांजा जप्त करीत एका संशयिताला अटक केली. मंगळवार, 12 रोजी ही कारवाई करण्यात आली. अर्जुन सुमायर्या पावरा (45, मेलाणे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
मका पिकात फुलवली गांजा शेती
संशयित अर्जुन पावरा याने शासनाकडून उपजिविकेसाठी मिळालेली नवाड शेतीत मका पिकाआड कॅनाबिस वनस्पती (गांजा) या अंमली पदार्थाच्या वनस्पतीची लागवड केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने कारवाई केली. 980 किलोची व एकूण 44 लाख 10 हजार रुपये किंमतीची गांजाची हिरवी झाडे जप्त करण्यात आली. संशयित अर्जुन सुमार्या पावरा (45, रा.मेलाणे, ता.चोपडा) याच्याविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.पोलीस निरीक्षक नितनवरे करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील, चोपडा ग्रामीण निरीक्षक कावेरी कमलाकर, वनविभागाचे अधिकारी कमल ढेकले, नायब तलसीलदार रवींद्र महाजन, फोटोग्राफर, वजनकाटा धारक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक अमोल मोरे, एएसआय युनूस शेख, हवालदार सुनील दामोदरे, संदीप पाटील, गोरख बागुल, प्रवीण मांडोळे, नंदलाल पाटील, दर्शन ढाकणे, अशोक पाटील, बबन पाटील, महिला हवालदार रजनी माळी, नाईक उपाली खरे आदींनी केली.
