उज्जैनमध्ये भस्म आरतीच्या वेळी गर्भगृहात आग : पूजार्यासह 14 भाविक होरपळले
Sanctum sanctorum fire during Bhasma Aarti in Ujain: 14 devotees including priest burnt to death उज्जैन : उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात सोमवारी पहाटे 5.49 वाजता भस्म आरती सुरू असताना कुणीतरी पुजार्यावर गुलाल उधळल्यानंतर गर्भगृहात आग लागली व या दुर्घटनेत मंदिरातील पूजारी व 14 भाविक होरपळले आहेत.
आगीप्रसंकगी यावेळी मंदिरात हजारो भाविक महाकालसोबत होळी साजरी करत होते. गुलालात काही रसायन असल्याने आग लागल्याचा अंदाज आहे.


आगीत हे भाविक होरपळले
सूत्रांच्या माहितीनुसार, संजीव पुजारी, सत्यनारायण सोनी, चिंतामण, रमेश, अंश, शर्मा, शुभम, विकास, महेश शर्मा, मनोज शर्मा, आनंद, सोनू राठौर, राजकुमार बैस, कमल, मंगल आदी भाविक होरपळले आहेत. 9 जखमींना इंदूर येथे हलवण्यात आले आहे तर तिघांना सुटी देण्यात आली.
जिल्हाधिकार्यांचे चौकशीचे आदेश
उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनी सांगितले की, या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तपासात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याशी चर्चा केली. त्यांनी त्यांच्या एक्स हँडलवर लिहिले, ’मुख्यमंत्री डॉ. यादव यांच्याकडून घटनेची माहिती घेतली आहे. जखमींना लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी बाबा महाकालकडे प्रार्थना करतो.







