अप-डाऊन गरीबरथ रद्द : सहा गाड्यांच्या मार्गात बदल
जबलपूर स्थानकावर नॉन इंटरलॉकींग कामांना सुरुवात
भुसावळ :जबलपूर रेल्वे स्थानकासह यार्डमध्ये नॉन इंटरलॉकिंग रीमोल्डिंग कामांसाठी अप-डाऊन गरीबरथ एक्स्प्रेस 21 रोजी रद्द करण्यात आली असून सहा गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.
अप-डाऊन गरीबरथ रद्द
गाडी क्रमांक अप 12187 जबलपूर-मुंबई गरीबरथ एक्सप्रेस प्रारंभिक स्थानकापासून 21 रोजी रद्द करण्यात आली तर डाऊन 12188 मुंबई-जबलपूर गरीबरथ एक्स्प्रेस प्रारंभिक स्थानकावरून 22 रोजी रद्द करण्यात आली आहे.
सहा गाड्यांच्या मार्गात बदल
डाऊन 16229 म्हैसूर-वाराणसी एक्स्प्रेस 20 रोजी म्हैसूरवरून भोपाळ, बीना, कटनीमार्गे वाराणसी पोहोचेल. अप 15563 जयनगर-उधना एक्स्प्रेस 23 रोजी जयनगरहून कटनी, बीना, भोपाळ, इटारसीमार्गे उधना पोहोचेल. डाऊन 12362 मुंबई-आसनसोल एक्स्प्रेस 21 रोजी मुंबईहून ईटारसी, भोपाळ, बीना, कटनीमार्गे वाराणसी पोहोचेल. अप 11062 दरभंगा लोकमान्य टिळक टर्मिनल्स पवन एक्सप्रेस एलटीटीवरून 23 रोजी कटनी, बीना, भोपाळ, ईटारसीमार्गे एलटीटीला पोहोचेल. अप 12150 दानापूर-पुणे एक्सप्रेस दानापू येथून 22 रोजी कटनी, बीना, भोपाळ, ईटारसीमार्गे पुण्याला पोहोचेल. डाऊन 12149 पुणे-दानापूर एक्स्प्रेस पुण्याहून 22 रोजी ईटारसी, भोपाळ, बीना, कटनीमार्गे दानापूरला पोहोचेल. रेल्वे प्रवाशांनी गैरसोयीबाबत दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.