अहिरवाडी वनक्षेत्रात 95 किलो अवैध सलाई डिंक जप्त ; आरोपी मात्र दुचाकी सोडून पसार

95 kg of illegal salai gum seized in Ahirwadi forest area ; But the accused left the bike and ran away रावेर : सातपुड्यातील अहिरवाडी वनक्षेत्रात अवैधरित्या सलई डिंक वाहतूक रोखण्यात वनविभागाला यश आले असून संशयीत अंधाराचा फायदा घेत पसार झाला तर वनविभागाने 95 किलो सलई डिंकासह दुचाकी जप्त केली.
वनकर्मचार्यांना पाहताच आरोपी वाहन सोडून पसार
रावेर वनक्षेत्रातील परिमंडळ अहिरवाडीमधील नियतक्षेत्र पडल्यामधील कं.नं. तीनमध्ये गस्त करीत असताना हिरो कंपनीची एच.एफ.डिलक्स कंपनीची दुचाकी ही अवैध सलई डिंक वाहतूक करतांना वन विभागाच्या गस्ती पथकाला आढळली. त्यात साधारण 95 किलो सलई डिंक आढळला मात्र अंधाराचा फायदा घेत आरोपी सलई डिंक व दुचाकी फेकून अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाला.
याप्रकरणी वनविभागात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 95 किलो सलाई डिंकाची किंमत 10 हजार 450 रुपये तर 36 रुपये किंमतीचे दुचाकी मिळून 46 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल वनविभागाने जप्त केला आहे. उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अजय बावणे, वनपाल राजेंद्र सरदार, वनरक्षक सुपडू सपकाळे, वाहन चालक विनोद पाटील यांनी ही कारवाई केली.


