जळगावात पेट्रोल पंपावरून एक लाखांची रोकड लांबवली : कामगाराला बेड्या


One lakh cash was stolen from a petrol pump in Jalgaon : the worker was shackled जळगाव : पेट्रोल पंपावरील हिशेबाची रक्कम घेऊन पसार झालेल्या कर्मचार्‍यास एमआयडीसी पोलिसांनी सुभाष वाडी भागातून अटक केली आहे. योगेश काळू राठोड असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.

अपहार करीत कामगार झाला होता पसार
शिरसोली रस्त्यावरील इशाणी पेट्रोल पंपावर योगेश राठोड कामाला होता. 8 ते 10 ऑगस्ट 2023 या कालावधीत कामावर असतांना पेट्रोल पंपावरील हिशेबाची एक लाख 2 हजार 709 एवढी रक्कम घेऊन तो पसार झाला होता. याबाबत त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात अपहाराचा गुन्हा मॅनेजर रवींद्र आधार पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नोंद झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर योगेश काळु राठोड याचा शोध सुरू असताना तो 3 रोजी सुभाषवाडीत आल्याची माहिती मिळताच त्यास अटक करण्यात आली. संशयीताला न्या.वसीम देशमुख यांच्या न्यायासनासमोर उभे केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सरकारपक्षाच्या वतीने याप्रकरणी अ‍ॅड.स्वाती निकम यांनी बाजू मांडली.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, हवालदार जितेंद्र राठोड, हवालदार समाधान टहाकळे, शुध्दोधन ढवळे, साईनाथ मुंढे आदींनी ही कारवाई केली.


कॉपी करू नका.