दिल्लीत लवकरच होणार प्रवेश सोहळा : कुठल्याही अटी-शर्थी नाही : आमदार एकनाथराव खडसे

Admission ceremony to be held soon in Delhi: No conditions: MLA Eknathrao Khadse भुसावळ : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी भाजपात घरवापसी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दिल्ली येथे पंधरा दिवसांच्या आत प्रवेश सोहळा होईल, असा दावा आमदार खडसे यांनी मुक्ताईनगरात रविवारी माध्यमांशी बोलताना केला. केंद्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची आपण नुकतीच भेट घेतली असून त्यांच्याशी भाजपात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
दिल्ली येथे लवकरच होणार प्रवेश सोहळा
आमदार खडसे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आगामी 15 दिवसात दिल्ली येथे केंद्रीय नेतृत्वाकडून बोलावणे आल्यानंतर आपला भाजपामध्ये प्रवेश होईल. भाजपामधील अनेक जुने नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करताना त्यांनी आपल्याला भाजपामध्ये असायला हवे होते, अशी चर्चा केली होती मात्र आपण आपली राजकीय परीस्थिती त्यांना सांगितली होती मात्र आपला आता भाजपात जाण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचा आपण ऋणी
अडचणीच्या काळात राष्ट्रवादीने आपल्याला प्रवेश दिला, आमदारकी दिल्याने आपण त्यांचे निश्चितच ऋणी आहोत. पक्षातून बाहेर पडण्यापूर्वी आपण राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांना सर्व बाबी लक्षात आणून दिल्याचेही आमदार खडसे यांनी सांगितले.
होय स्वगृही परततोय : आमदार एकनाथ खडसे
शनिवारी आमदार एकनाथराव खडसे यांनी आपल्या घरवापसीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांचे रविवारी मुक्ताईनगरात आगमन झाले. यावेळी आमदार खडसे म्हणाले की, भाजपा हे घर असून ते मी बांधले आहे. या घराच्या पायापासून माझे योगदान आहे. माझ्या घरातून मी नाराजीमुळे मी बाहेर पडलो मात्र आता माझी नाराजी दूर झाली आहे व लवकरच मी माझ्या हक्काच्या घरात परतत आहे. लवकरच आपण आपल्या घरी जाणार असून त्याबाबतची घोषणा आपण जाहीरपणे करू. असेही आमदार खडसे म्हणाले.
मंत्री गुलाबराव पाटलांनी केले निर्णयाचे स्वागत
जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार एकनाथराव खडसे यांच्या भाजपात परतण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आमदार खडसे हे मूळ विचारधारेत परतत असल्याने आम्ही त्यांचे स्वागत करू व त्यांनी आमच्यावर टिका केली असलीतरी ती टिका आम्ही विसरून जावू, असेही पालकमंत्री म्हणाले.
अॅड.रोहिणी खडसे राष्ट्रवादीत राहणार !
नाथाभाऊंच्या भाजपा प्रवेश करीत असलेतरी त्यांच्या कन्या अॅड.रोहिणी खडसे मात्र राष्ट्रवादीत राहून तुतारीचा प्रचार करणार आहेत. आगामी काळात विधानसभा निवडणुका असल्याने मुक्ताईनगरची जागा युतीतील शिंदे गटाकडे आहे त्यामुळे आमदार चंद्रकांत पाटील यांना फाईट देण्यासाठी कदाचित हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे.
दिल्लीत लवकरच होणार प्रवेश सोहळा : कुठल्याही अटी-शर्थी नाही : आमदार एकनाथराव खडसे


