आमदार एकनाथराव खडसेंच्या भाजपा प्रवेशावर उपमुख्यमंत्री फडणविसांनी दिली ही प्रतिक्रिया


मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी भाजपात घरवापसी करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेचे संमिश्र प्रतिसाद पक्षातून उमटत आहे. केंद्रीय नेतृत्वाकडूनच आमदार एकनाथराव खडसे यांचा प्रवेश होत असल्याने या प्रवेश सोहळ्याकडे लक्ष लागले आहे. त्यातच आमदार खडसे व व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील सख्य राज्याला ठावूक आहे. खडसेंच्या घरवापसीबाबत फडणवीसांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी अत्यंत सावध पवित्रा घेत प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात कोणी प्रवेश करत असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू या संदर्भात पक्षाने अद्याप आम्हाला माहिती दिलेली नाही मात्र पक्षाने या संदर्भात आम्हाला माहिती दिली तर त्यांचेदेखील आम्ही स्वागतच करू, असे देखील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले आहे.

मोदीजींच्या सभांमुळे वातावरण बदलेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात होत आहे. या सभेच्या निमित्ताने प्रचंड उत्साह लोकांमध्ये आहे. मोदीजी यांच्या सभेने सर्व वातावरण बदलते आहे. आज विदर्भात भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला अनुकूल परिस्थिती आहे. मात्र मोदींच्या सभेने महायुतीची अनुकूलता अधिक मोठ्या विजयात परावर्तित होईल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
चंद्रपूरनंतर रामटेक मध्ये देखील 10 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभांनी पूर्ण विदर्भातील वातावरण ढवळून निघेल, असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

उर्वरीत उमेदवारांची एकत्रित घोषणा
महायुती मधील अनेक जांगांवरील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित जागांची एकत्रित घोषणा आम्ही करणार आहोत. त्यामुळे प्रचाराला सुरुवात ही केलीच पाहिजे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांनी प्रचाराची सुरुवात केली, यात काहीच गैर नाही. याबाबत आम्ही निर्णय घेतला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी मिळावे घ्या, असे देखील निर्देश पक्षाने दिलेले आहेत. त्यामुळे तयारी केलीच पाहिजे. असे म्हणत नारायण राणे यांच्या प्रचारासंदर्भातील प्रश्नाला देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर देणे टाळले आहे.

तर खडसे यांचेही स्वागतच
दरम्यान, आमदार एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षामध्ये येणार आहेत, या प्रश्नाचेही थेट उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात कोणी प्रवेश करत असेल तर त्याचे आम्ही स्वागतच करू या संदर्भात पक्षाने अद्याप आम्हाला माहिती दिलेली नाही. मात्र पक्षाने या संदर्भात आम्हाला माहिती दिली तर त्यांचेदेखील आम्ही स्वागतच करू, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.


कॉपी करू नका.