हरीभाऊ जावळेचे भुसावळात जंगी स्वागत
भुसावळ- रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार हरीभाऊ जावळे यांची महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे (कॅबिनेट मंत्री दर्जा ) पदी नेमणूक झाल्यानंतर त्यांनी पुणे येथे पदभार साभाळल्यानंतर प्रथमच त्यांचे जळगाव जिल्ह्यातील भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी भुसावळ नगरपालिका अध्यक्ष रमण भोळे, वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे, माजी सभापती हिरालाल चौधरी, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील, भाजप यावल तालुकाध्यक्ष नरेंद्र कोल्हे, सरचिटणीस विलास चौधरी, सरचिटणीस उज्जैनसिंह राजपूत, नगरसेवक परीक्षीत बराटे, कृ.उ.बा.संचालक नारायण चौधरी, जिल्हा परीषद सदस्य सविता भालेराव, पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष लहू पाटील, प्रा.जतीन मेढे, नगरसेवक अॅड.बोधराज चौधरी, नगरसेवक प्रमोद नेमाडे, दिलीप सपकाळे, महेंद्र कोळी, सतीश सपकाळे, श्याम महाजन, राहुल पाटील, शेखर इंगळे, ज्ञानेश्वर तायडे, उमेश पाटील, किशोर कोळी, खेमराज कोळी, नितीन कोळी, विजय मोरे, प्रफुल्ल भोळे, गिरीश तळेले, साहेबराव केदारे, गोपाळ पाटील, व्यंकटेश बारी, अविनाश तायडे, अतुल भालेराव, दिलीप चौधरी, अरुण चौधरी, वैभव वारके, योगेश इंगळे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.