कळंबूच्या दोघा भावांना डंपरने उडवले
शहादा : वाळू वाहतूक करणार्या भरधाव ट्रकने दुचाकीला उडवल्याने कळंबू (ता. शहादा) येथील दोघे सख्खे चुलत भाऊ जागीच ठार झाले. मंगळवारी दुपारी 3 ते 3.30 वाजेदरम्यान निमगूळ ते टाकरखेडा दरम्यान हॉटेल साईजवळ हा अपघात झाला. राकेश पोपट बोरसे (37) व पुष्पराज प्रकाश बोरसे (19) हे या अपघातात ठार झाले. घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला.
