जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक आठवडी बाजारात ‘मतदार सुविधा कक्ष’ स्थापन होणार

8 मे पर्यंत ही सुविधा होणार उपलब्ध

0

A ‘voter facility room’ will be established in every weekly market in Jalgaon district जळगाव : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात आठवडे बाजार असलेल्या प्रत्येक गावी ‘मतदार सुविधा कक्ष’ स्थापन केली जात आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार बाजाराच्या दिवशी हे मतदार सुविधा केंद्र उभारून मतदारांना मतदानविषयक सर्व माहिती द्यायची आहे. त्यात मतदानापूर्वी आपली मतदार यादीत नाव कसे बघायचे, स्लीप कशी काढायची, पुराव्यासाठी 12 पैकी कोणतेही एक असेल तर ते गृहीत धरले जाते. याबाबतही त्यांना अवगत करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे सुविधा केंद्र 8 मे पर्यंत उभारले जाणार आहेत. मतदान सुविधा केंद्र उभारून जनजागृती बाबतचे आदेश सुरू केल्यानंतर पारोळा, जळगाव, चोपडा येथील रविवार आठवडे बाजारात सुविधा केंद्र उभारून मतदारांना सविस्तर माहिती दिली.

जळगाव लोकसभा मतदार संघासाठी लोकसभा सार्वत्रीक निवडणूक 2024 ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शनिवार, 13 मे 2024 रोजी एरंडोल विधानसभा मतदार संघात मतदान होणार आहे. मतदार सुविधा कक्ष स्थापन करून त्याव्दारे बाजारात येणार्‍या सर्व मतदारांना निवडणूक विषयक माहिती उपलब्ध करून द्यायची आहे त्या मतदान केंद्राचा तपशील, मतदार यादीतील मतदाराचा अनुक्रमांक शोधून देणे तसेच त्यासाठी उपयुक्त असलेले वोटर हेल्पलाईन अ‍ॅपबाबत मतदारांना माहिती देणे. मतदारांना मतदानासाठी आवश्यक असलेले 12 पुरावे कोण-कोणते आहेत त्याची माहिती देण्याबाबत जनजागृती करायची आहे.


कॉपी करू नका.