लोकसभा निवडणुकीत भाजपाने उघडले खाते : सुरतमध्ये मुकेश दलाल बिनविरोध विजयी

सुरत : गुजरातच्या सुरत लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुकेश दलाल सोमवारी बिनविरोध निवडून आले. काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्यानंतर अन्य उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर दलाल यांची बिनविरोध निवड झाली.
अखेर झाली बिनविरोध निवड
या जागेवर भाजप आणि काँग्रेससह 10 उमेदवार रिंगणात होते. रविवारी 7 अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. फक्त बसपचे उमेदवार प्यारे लाल भारती राहिले होते, त्यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अशा प्रकारे मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली.