भुसावळात जनआक्रोश मोर्चेकर्‍यांचा वीज कंपनी अभियंत्यांना घेराव


भुसावळ : रेडीओ फिक्वेन्सी वीज मीटर हटविण्याच्या मागणीसाठी सोमवारी उत्तर महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेने अष्टभूजा देवी मंदिरापासून जनआक्रोश आंदोलन मोर्चा काढला. महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडकल्यानंतर मोर्चेकर्‍यांनी कार्यकारी अभियंता पी.आर.घोरुडे यांना घेराव घालत पूर्ववत जुने वीज मीटर बसवण्याची मागणी केली. शहरातून वाढीव वीजबिल व फॉल्टी वीज मीटरच्या साडेचार हजार तक्रारी असल्याचे ग्राहकांनी सांगितल्यानंतर घोरुडे यांनी केवळ शंभर ते दीडशे तक्रारी असून त्यांचा निपटारा केला जात असल्याचे सांगितले. अखेर मोर्चेकर्‍यांनी आंदोलनाचा संविधानिक मार्ग बदलून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.

अधिकार्‍यांना घातला घेराव
शहरातील अष्टभूजा देवी मंदिरापासून निघालेला हा मोर्चा तापी नगरातील महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडकला. विविध मागण्यांच्या संदर्भात कार्यकारी अभियंता पी.आर.घोरुडे यांनी ग्राहकांना नेहमीप्रमाणे उत्तरे दिल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त करीत कार्यकारी अभियंता घोरुडे यांना घेराव घातला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन आदींसह शहरातील वीज ग्राहक उपस्थित होते.


कॉपी करू नका.