राज्यातील अविवाहित तरुणांना लग्न बेडीत अडकवून फसवणूक : महिला दलालांची टोळी कासोदा पोलिसांच्या जाळ्यात

मधुचंद्राच्या रात्री नववधू लांबवयाची दागिणे : तक्रारदारांना तक्रार नोंदवण्याचे आवाहन

0

Unmarried youths of the state are being cheated by getting married : A gang of women brokers in the net of Kasoda police जळगाव : अविवाहित तरुण हेरून त्यांना दलाल महिलेच्या माध्यमातून स्थळ दाखवयाचे व तरुणी पसंत पडताच दोन ते पाच लाखात व्यवहार करून लग्न लावले जायचे मात्र मधूचंद्रांच्या रात्री वराकडील मंडळी गाढ झोपेत असताना नववधू मात्र दलाल महिलांच्या माध्यमातून घरातील सर्व दागिण्यांसह पैसे घेवून पसार होण्याचे प्रकार घडले होते. या पार्श्वभूमीवर कासोदा पोलिसातही गुन्हा दाखल होता. कासेादा पोलिसांनी अत्यंत शिताफीने या गुन्ह्याचा तपास करीत दलाल महिलांच्या तब्बल पाच जणांच्या टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. अनेक फसवणुकीचे प्रकार आता समोर येण्याची दाट शक्यता आहे.

टोळीने केली महाराष्ट्रभर फसवणूक
कासोदा पोलीस स्टेशनला फसवणूक प्रकरणी असेच गुन्हे दाखल आहे. या गुन्ह्यातील आरोपी मोना दादाराव शेंडे (25), सरस्वती सोनू मगराज (28, दोन्ही रा.रायपूर, छत्तीसगड), अश्विनी अरुण थोरात (26, रा. पांढुरना, मध्य प्रदेश) यांचा कासोदा येथील तीन तरुणांसोबत सरलाबाई अनिल पाटील (60) व उषाबाई गोपाल विसपुते (50, दोन्ही रा.नांदेड, ता.धरणगाव) या दलाल महिलेने 16 एप्रिल 2024 रोजी विवाह लावून दिला होते. विवाहानंतर काही दिवस चांगला संसार केल्यानंतर टोळीतील महिला सदस्यांनी पळ काढला होता.

गोपनीय माहितीवरून आरोपींना अटक
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षका कविता नेरकर-पवार, सहाय्यक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कासोदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत, सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील, राकेश खोंडे, किरण गाडीलोहार, इम्मान पठाण, नितीन पाटील, सविता पाटील यांच्या पथकाने दलाल असलेल्या नांदेड (ता. धरणगाव) येथील सरलाबाई पाटील व उषाबाई विसपुते यांना अटक केल्यानंतर अन्य तिघांनाही अटक करण्यात आली.

राज्यातील अनेकांची फसवणूक
आरोपी महिलांनी उपवर तिन्ही मुलांच्या घरच्यांना विश्वासात घेऊन व त्यांच्याशी विवाह लावून देण्याचे आमिष दाखवले व तिन्ही मुलांच्या कुटुंबियांकडून सर्व मिळून चार लाख 13 हजार रुपये उकळत विवाहित असलेल्या मोना शेंडे, सरस्वती मगराज व अश्विनी थोरात यांचा विवाह लावून दिला व याच पद्धत्तीने राज्यभरात अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे.

आरोपी महिलेच्या माहितीनुसार, यातील तिघांचा यापूर्वीच विवाह झालेला असून त्यांना मुले आहेत आणि आम्ही तिघी फसवणुकीचा प्रकार करण्यासाठी घरातून महाराष्ट्रात आलो आहोत. कासोद्यातील तिन्ही तरुणांसह नांदेडच्या दोन्ही साथीदारांची आर्थिक फसवणूक केल्याचे त्यांनी कबूल केले आहे.


कॉपी करू नका.