पाकिस्तानचे समर्थन करणार्यांनी पाकिस्तानात जावे : योगी आदित्यनाथ
Those who support Pakistan should go to Pakistan : Yogi Adityanath धुळे : अयोध्येतील राम मंदिरा संदर्भात न्यायालयाचा निकाल आल्यानंतर देशात दंगे होतील, असे काँग्रेस सरकार म्हणत होत. मात्र आता हा नवीन भारत आहे, राम मंदिराचा निकालही लागला आणि राम मंदिर देखील उभे राहिले, असे म्हणत योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसच्या वतीने पाकिस्तानचे समर्थन केले जात असल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला. पाकिस्तानचे समर्थन करणार्यांनी पाकिस्तानात राहायला जावे. भारताचे खातात आणि पाकिस्तानचे गुणगान करतील, त्यांना भारतात स्थान नाही, असा इशारा देखील योगी आदित्यनाथ यांनी दिला.
देशात पुन्हा मोदी सरकार येणार !
‘आपकी बार 400 पार’चा नारा दिला की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकते. मात्र तुम्ही कोणतीही शंका मनात ठेऊ नका. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार असल्याचा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. मालेगाव आणि धुळे येथील बांधवांना अयोध्या येथे राम मंदिराला दर्शनासाठी या असे आमंत्रण देखील योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. राम मंदिरात महाराष्ट्रातील हजारो कार सेवकांचे योगदान असल्याचे ते म्हणाले. अयोध्येतील राम मंदिर हे 140 कोटी नागरिकांच्या आस्थचे प्रतिक असल्याचा दावा देखील योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.









