25 हजारांची लाच मागणी भोवली : पारोळा तालुक्यातील महिला तलाठी धुळे एसीबीच्या जाळ्यात


25,000 bribe demanded : Talathi Dhule, a woman from Parola taluka, in ACB’s net पारोळा : रॉयल्टी भरूनही त्याची पावती न देता मातीची वाहतूक करण्यासाठी 25 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पारोळा तालुक्यातील शिवरेदिगर तलाठी वर्षा रमेश काकुस्ते (38, पी.डब्ल्यू.डी. शासकीय निवासस्थान, पारोळा बस स्थानकाच्या समोर, पारोळा) यांना धुळे एसीबीने अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवरी दुपारी करण्यात आल्यानंतर महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

असे आहे लाच प्रकरण
धुळे जिल्ह्यातील 43 वर्षीय तक्रारदार यांचा वी उत्पादनाचा व्यवसाय आहे. त्यांनी आरोपी तलाठी यांच्याकडे गौण खनिजाच्या रॉयल्टीपोटी 25 हजारांची रक्कम जमा केली आहे मात्र त्याची पावती न देता मातीची वाहतूक करण्यासाठी तलाठी काकुस्ते यांनी 13 डिसेंबर 2023 रोजी 25 हजारांची लाच मागणी केली होती व त्याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर पडताळणी करण्यात आली. लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे एसीबीच्या पडताळणी समोर आले व त्याबाबतचा अहवाल आल्यानंतर शुक्रवारी पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करून महिला तलाठ्याला अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
हा कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, प्रशांत बागुल, चालक पोलीस शिपाई बडगुजर आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.