75 महसूल मंडळातील केळी उत्पादकांना हेक्टरी 36 हजारांप्रमाणे भरपाई मिळणार!

खासदार रक्षा खडसे यांची माहिती : कमी व अधिक तापमानाचा मिळणार लाभ


Banana producers in 75 revenue circles will get compensation like 36 thousand hectares! भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील 75 महसूल मंडळात सलग पाच दिवस तापमान 42 डिग्री व त्यापेक्षा जास्त राहिल्याने केळी पिकाला अधिक तापमानाचा फटका बसल्याने केळी उत्पादक संकटात सापडले होते मात्र केळी उत्पादकांना झालेल्या नुकसानीपोटी पीक विमा कंपनीकडून आता भरपाई दिली जाणार आहे. कमी तापमानासाठी किमान 26 हजार 500 तर अधिक तापमानासाठी 36 हजार रुपये प्रति हेक्टरी लाभ मिळणार असल्याचे माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

खासदारांकडून भरपाईसाठी पाठपुरावा
यापूर्वी 1 नोव्हेंबर 2023 ते 28 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जिल्ह्यातील 36 महसूल मंडळात सलग तीन दिवस आठ डिग्री व त्यापेक्षा कमी तापमानामुळे प्रति हेक्टर रक्कम 26 हजार 500 रुपये अशी नुकसान भरपाई आधीच मंजूर झाली होती. हा लाभ लवकर मिळण्यासाठी योग्य तो पाठपुरावा सुरू असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

  • अधिक तापमानासाठी या महसूल मंडळात मिळणार भरपाई
    अमळनेर- अमळनेर, अमळगाव, भरवस, मारवड, नगाव, पातोंडा, शिरूड, वावडे
    भडगाव- भडगाव, कजगाव, कोळगाव.
    चाळीसगाव- बहाळ, चाळीसगाव, हातले खडकी बू., मेहुनबारे, शिरसगाव, तळेगाव.
    धरणगाव- धरणगाव, चांदसर, पाळधी, पिंप्री, साळवा, सोनवद.
    एरंडोल- एरंडोल, कासोदा, रिंगणगाव, उत्राण गृह.
    जळगाव- असोदा, नशिराबाद, जळगाव शहर,भोकर, म्हसावद, पिंप्राळा.
    पाचोरा- गाळण बु.॥, कु-हाड बु.॥, नगरदेवळा, नांद्रा, पाचोरा, पिंपळगाव बु., वरखेडी बु.॥,
    पारोळा- बहादरपूर, चोरवड, पारोळा, शेळावे,तामसवाडी.
    भुसावळ- भुसावळ, कुर्‍हे, वरणगाव, पिंपळगाव खुर्द
    बोदवड- बोदवड, नाडगाव.
    चोपडा- चोपडा, अडावद, चहार्डी, गोरगावले, हातेड बु., लासुर.
    जामनेर- जामनेर, पहूर, नेरी बु., शेंदुर्णी, वाकडी.
    मुक्ताईनगर- अंतुर्ली, घोडसगाव, कु-हे, मुक्ताईनगर.
    रावेर= ऐनपूर, खानापूर, खिर्डी बु.॥, खिरोदा, निंभोरा बु.॥, सावदा.
    यावल- बामनोद, किनगाव बु.॥
  • कमी तापमानासाठी या मंडळात मिळणार भरपाई
    अमळनेर- अमळनेर, अमळगाव, मारवड, नगाव, पातोंडा.
    भडगाव- कजगाव, कोळगाव
    चाळीसगाव- बहाळ, शिरसगाव
    धरणगाव- चांदसर, साळवा, सोनवद
    एरंडोल- उत्राण
    जळगाव- भोकर, म्हसावद
    पारोळा- बहादरपूर, शेळावे
    बोदवड- बोदवड, करंजी
    चोपडा- चोपडा, धानोरा प्र., गोरगावले, हातेड बु.
    जामनेर- फत्तेपूर, जामनेर, नेरी बू.
    मुक्ताईनगर- अंतूर्ली घोडसगाव, मुक्ताईनगर
    रावेर- खानापूर, खिर्डी बु., निभोरा बु., रावेर, सावदा
    यावल- बामनोद, फैजपूर

कॉपी करू नका.