दहिगाव येथील शेतकर्‍याची गोठ्यातून गाय चोरीला

0

यावल : यावल तालुक्यातील दहिगाव येथील शेतकर्‍याचे सावखेडासीम गावालगत चुंचाळे रस्त्यावर शेत आहे. या शेतात त्यांनी गुरांसाठी गोठा बांधला आहे. या गोठ्यातून अज्ञात चोरट्याने गाय चोरी केली. 15 हजार रुपये किंमतीची ही गाय चोरी झाल्याचे शुक्रवारी सकाळी निदर्शनास आले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पशूधनाच्या चोरीने शेतकरी त्रस्त
दहिगाव, ता.यावल या गावातील शेतकरी समाधान दिलीप पाटील यांचे सावखेडासिम गावालगत चुंचाळे रोडावर शेत गट क्रमांक 317 (1) आहे. यामध्ये त्यांनी गुरांसाठी गोठा बांधला आहे. या गोठ्यात त्यांच्या दोन गायी आणि पाच वासरू बांधलेली होती. त्यापैकी एक 15 हजार रुपये किंमतीची गाय शुक्रवारी सकाळी गोठ्यात नव्हती. या गायीचा सर्वत्र शोध घेण्यात आला. मात्र गाय कुठेच मिळाली नाही. या गायीला ज्या दोराने बांधले होते ते कापलेले दिसून आले. अज्ञात चोरट्याने गाय चोरी केली असावी अशी खात्री झाली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गाय चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.


कॉपी करू नका.