एक्झीट पोलचा अंदाज : देशात पुन्हा मोदी सरकारच येणार!
Exit poll prediction: Modi government will come again in the country! नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर आता एक्झीट पोल समोर येवू लागला आहे. र देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा पूर्ण बहुमतासह पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता त्यातून वर्तवण्यात आली आहे मात्र आकडा मात्र 400 पार जाणार नसल्याचे समोर आले आहे. भाजपा आणि एनडीएला मिळून साडेतीनशेच्यावर जागा मिळताना दिसत आहे, असा अंदाज एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे.
एक्झिट पोलचा अंदाज
लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यातील मतदान आटोपल्यानंतर आता विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांचे एक्झिट पोल समोर येऊ लागले आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा पूर्ण बहुमतासह पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता आहे. मात्र अबकी बार 400 पार हा मोदींचा नारा सत्यात उतरताना दिसत नसून, भाजपा आणि एनडीएला मिळून साडेतीनशेच्यावर जागा मिळताना दिसत आहेत. टीव्ही नाईन पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला 353 ते 368 जागा मिळण्याची शक्यता आहे.


इंडिया आघाडीला 133 जागा मिळण्याची शकय्ता
टीव्ही नाईन पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलमधील आकडेवारी पाहिल्यास देशातील 543 जागांपैकी 353 ते 368 जागा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीच्या खात्यात 118 ते 133 जागा जाण्याची शक्यता आहे. तर इतर पक्ष 43 ते 48 जागा जिंकण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मात्र भाजपाला धक्का
या एक्झिट पोलममध्ये महाराष्ट्रासाठी मात्र धक्कादायक अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार देशात जोरदार मुसंडी मारणार्या भाजपा आणि एनडीएला महाराष्ट्रामध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात महायुतीला 22 आणि महाविकास आघाडीला 25 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे तर इतरांच्या खात्यात एक जागा जाऊ शकते.
याबरोबरच रिपब्लिक पीएमआरक्यूच्या एक्झिट पोलनुसार देशात भाजपाच्या नेतृत्वाखालील एनजीएला 359 आणि इंडिया आघाडीला 154 जागा मिळण्याची शक्यता आहे. या सर्व्हेनुसार महाराष्ट्रामध्ये महायुतीला 27 ते 32 आणि महाविकास आघाडीला 15 ते 20 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना एक जागा मिळू शकते







