!-- afp header code starts here -->

रेल्वेची धडक मोहिम : 1285 फुकट्या प्रवाशांकडून सात लाखांचा दंड वसुल


Railway strike campaign : 1285 free passengers fined Rs 7 lakhs भुसावळ : उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वे गाड्यांना वाढलेली प्रवाशांची गर्दी पाहता फुकट्या प्रवाशांची संख्यादेखील वाढली आहे त्यामुळे अशा प्रवाशांविरोधात 30 व 31 मे रोजी विशेष मोहिम राबवण्यात आली. दोन दिवसात भुसावळ विभाागत एक हजार 285 प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली व या माध्यमातून सात लाख सहा हजारांचा दंड वसुल करण्यात आला या शिवाय अनधिकृत विक्रेते व धूम्रपान करणार्‍यांविरोधातही कारवाई करण्यात आली. या मोहिमेमुळे मात्र फुकट्या प्रवाशांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

भुसावळ विभागात मोहिम
विभागीय रेल्वे व्यवस्थापक ईती पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार आणि सहायक वाणिज्य व्यवस्थापक (तिकीट चेकिंग) पी.के.सिंग यांच्या नेतृत्वात भुसावळ विभागामध्ये तिकीट तपासणी मोहिम राबविण्यात आली. ही मोहिम विभागातील भुसावळ, मनमाड, नाशिक, खंडवा, बडनेरा, अकोला, जळगाव, बर्‍हाणपूर, चाळीसगाव, मलकापूर, शेगाव या स्थानकावर राबवण्यात आली. या अभियानात सहाय्यक वाणिज्य प्रबंधक, मुख्य वाणिज्य निरीक्षक, वाणिज्य पर्यवेक्षक, तिकीट तपासणीस आणि आरपीएफ कर्मचारी सहभागी झाले.

1472 प्रवाशांवर कारवाई
विनातिकीट प्रवास करणार्‍या एक हजार 285 प्रवाशांकडून सात लाख सहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. धुम्रपान करणारे 121 प्रकरणात 39 हजार 250 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. एकूण एक हजार 472 केसेसमधून सात लाख 54 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. 15 अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली.


<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !