ऐतिहासीक विजय : धुळे लोकसभेत डॉ.शोभा बच्छाव विजयी : डॉ.भामरेंचा पराभव

0

Historic victory: Dr. Shobha Bachhao wins in Dhule Lok Sabha : Dr. Bhamre’s heavy defeat धुळे : धुळे लोकसभा हा एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला असलातरी गेल्या तीन निवडणुकीपासून भाजपच्या ताब्यात होता त्यामुळे यंदा झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत दोन डॉक्टरांमध्ये कोण बाजी मारणार ? याकडे मतदारांचे लक्ष होते. मंगळवारी हाती आलेल्या निकालानुसार भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांचा दारुण पराभव झाला असून काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव या तीन हजार 831 मतांनी विजयी झाल्या आहेत.

 डॉक्टर भामरेंना नाकारले
धुळे मतदारसंघात विद्यमान खासदार तथा माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे हे तिसर्‍यांदा नशीब आजमावत होते. प्रारंभी एकतर्फी वाटणारी लढत महाविकास आघाडीने डॉ.शोभा बच्छाव यांना दिलेल्या तिकीटामुळे अत्यंत चुरशीची झाली.

धुळे ग्रामीण व शिंदखेडा या तीन तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य व बागलाण हे तीन अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश असल्याने उत्तर महाराष्ट्रातील ही राजकीयदृष्ट्या महत्वाची लढत होती मात्र या निवडणुकीत डॉ.बच्छाव यांनी बाजी मारली आहे.


कॉपी करू नका.