इंडिया अलायन्सकडून नितीश कुमार यांना उपपंतप्रधान बनवण्याची ऑफर !


नवी दिल्ली : इंडिया अलायन्सने नितीश कुमार यांना उपपंतप्रधान बनवण्याची ऑफर दिल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर आले असून त्यातच निकाल आणि कल यांच्यात भाजपप्रणित एनडीए जरी पुढे असली तरी विरोधकांच्या इंडिया आघाडीने अपेक्षेपेक्षा अप्रतिम कामगिरी करून दाखवली आहे. दुपारी हाती आलेल्या कलांच्या आधारवर भाजपाला 250चा आकडा गाठता आला नव्हता. एनडीए मध्ये नितीश कुमारांच्या जेडीयूच्या 14 जागांचा समावेश आहे. अशा परीस्थितीत सरकार स्थापन करण्यात जेडीयूची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

चर्चेचा मात्र इन्कार
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी नितीश कुमार यांच्याशी चर्चा केली आहे. जेडीयूकडून मात्र या वृत्ताचा इन्कार करण्यात आला आणि जेडीयू एनडीएचाच भाग राहिल, असे सांगण्यात आले आहे. तसेच, शरद पवार यांनीदेखील पत्रकार परिषद घेत आपण कोणाशीही फोनवर संपर्क केलेला नाही असे स्पष्ट केले. पण काही सुत्रांच्या म्हणण्यानुसार, शरद पवार आणि नितीश कुमार हे दोघेही कसलेले राजकारणी आहेत. त्यामुळे हे दोनही नेते मनात काय सुरु आहे याचा ताकास तूर लागू देणार नाही, असे बोलले जात आहे.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !