भाजपाला मोठा धक्का : माधवी लता व नवनीत कौर पराभूत
मुंबई : यंदाची लोकसभा निवडणूक भाजपासाठी मोठी धक्कादायक ठरली आहे. विविध संस्था व एक्झिट पोलच्या अंदाजांना खोटं ठरवत जनतेनं मनातील कौल दिला आहे. राज्यात भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा फटका बसला आहे. देशभक्त म्हणून ज्यांना भाजपने प्रमोट केलं ते उज्जल निकमही पराभूत झाले असून अमरावतीमधून भाजपच्या नवनीत राणा पराभूत झाल्या आहेत तर हिंदू शेरणी म्हणून राणांचा प्रचार झाला होता तर, नवनीत राणा ज्यांच्या प्रचारासाठी हैदराबादला गेल्या त्या माधवी लता यांचाही पराभव झाला आहे.
ओवेसी व वानखडे विजयी
हैदराबादमध्ये एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी हे विजयी झाले आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सायंकाळी पाच वाजेपर्यंत असदुद्दीन औवेसी यांनी तीन लाखांपेक्षा जास्त आघाडी घेतल्याचं दिसून आलं. त्यामुळे, येथील भाजप उमेदवार माधवी लता यांचाही पराभव झाल्याचे दिसून आले तर अमरावती लोकसभा मतदार संघातून बळवंत वानखडे विजयी झाले आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी जवळपास पूर्ण झाली असून केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. त्यामुळे, निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नवनीत राणा यांना पराभवाचा फटका बसला आहे.









