काट्याची लढत म्हणणार्‍यांना खासदार रक्षा खडसेंची चपराक : राजकीय भाकिते ठरवली चुकीची


MP Raksha Khadse slaps those who call it a thorn fight : Political predictions are wrong मुक्ताईनगर : राजकीय धुरंधरांची भाकितं चुकीची ठरवत खासदार रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून फेरीनिहाय आघाडी घेतली. नव्हे तर काट्याची लढत मानणार्‍यांना चपराक देत मोठे मताधिक्य घेऊन विजय मिळविला आहे. सलग तिसर्‍यांदा विजयी होवून खासदार खडसे यांनी हॅट्रीक निर्माण केली आहे.

राष्ट्रवादीची रणनीती ठरली फेल
राष्ट्रवादी शरद पवार गटाची रणनीती मुक्ताईनगर मतदारसंघात तोंडघशी पडली आहे. सुरुवातीपासून मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्र आपल्या बाजूने मानणार्‍या महाविकास आघाडीला येथून दणका मिळाला आहे. मराठा-मुस्लीम समीकरण
मतदारांनी पुरते खोटे ठरविले आहे. वास्तविक आमदार खडसे यांच्या दरवेळेच्या विधानसभा निवडणूक प्रसंगी आखल्या जाणार्‍या रणनीतीचाच भाग यंदा लोकसभा निवडणुकीत मुक्ताईनगर विधानसभेत रक्षा खडसे यांना फायद्याचा ठरला.

रणनीती आली कामाला
मराठा उमेदवार विरोधात इतर लहान-लहान समाजाची मोट बांधण्याची रणनीती यावेळी कामाला आली. लेवा पाटील समाजाचा एकमेव खासदार आणि त्याच्या जोडीला गुजर समाजाची मुलगी हा मुद्दा अंतर्गत मजबुतीने चालला. दुसरीकडे शरद पवार यांच्या सभेत मुक्ताईनगर मतदारसंघातून आघाडी देण्याचा शब्द पूर्ण करण्यात अ‍ॅड.रोहिणी खडसे अपयशी ठरल्या त्यामुळे त्यांची मतदारसंघावरची पकड किती? यावर त्यांना आत्मचिंतन करावे लागणार आहे. लागणार आहे.

राष्ट्रवादीत समन्वयाचा अभाव
मोदींना मानणारा गट आणि भाजपाची बूथपासून घराघरापर्यंतची यंत्रणा भाजप कार्यकर्त्यांचा सर्वसामान्यां सोबतचा राबता या भाजपच्या संघटनात्मक बाबी फायद्याच्या ठरल्या तर दुसरीकडे श्रीराम पाटील यांची गचाळ बूथ यंत्रणा, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव आणि अतिआत्मविश्वास यामुळे निवडणूक हाताबाहेर गेली.

आमदार खडसेंनी केली प्रतिष्ठेची निवडणूक
आमदार एकनाथराव खडसे यांनी निवडणूक प्रचार सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीतून भाजपात जाण्याची घोषणा करून सुनेसाठी प्रचाराची मोकळीक मिळविली. अधिकतर यंत्रणा फिरविली, जुने सहकारी मिळविले व त्याचा फायदा खासदार रक्षा खडसे यांच्या विजयात झाला.

आमदार चंद्रकांत पाटील यांची भूमिका भाजपाला फायदेशीर
लोकसभा निवडणुकीत प्रारंभी प्रचारापासून दोन हात लांब असलेले मुक्ताईनगरातील अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीही अंतिम चरणात प्रचारात सहभाग दर्शवला व विरोध मावळल्याने त्याचा फायदा खासदार खडसे यांना झाला.


कॉपी करू नका.