जम्मू येथून सिंधू दर्शन यात्रेला सुरूवात
जम्मू : सिन्धू मातेच्या जयकारानंतर जम्मू येथून सिन्धू दर्शन यात्रेला सुरूवात झाली आहे. 5 से 8 जूनपर्यंत सिन्धू नदीच्या काठी सिन्धू दर्शन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतीय सिन्धू सभेद्वारा आयोजित सिन्धू दर्शन यात्रा 2024 चा शुभारंभ गत शनिवारी जम्मू येथून करण्यात आला. 14 बसेसद्वारे 450 यात्री सेहरावाले साईं यांनी भगवान श्री झूलेलालांची प्रार्थना करीत आशीर्वाद प्राप्त केला. जम्मू कश्मीर प्रान्त सेवा प्रमुख एवं विभाग प्रचारक परमीत जी, भारत विकास परिषद-जम्मू कश्मीर प्रान्तचे कार्याध्यक्ष राजेश गुप्ता यांनी धर्म ध्वजाचे अनावरण केल्यानंतर भाविक यात्रेला रवाना झाले.


भारतीय सिन्धू सभा राष्ट्रीय महामंत्री राजेश वाधवानी, राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकेश लखवानी, भारतीय सिन्धू सभा महिला शाखा राष्ट्रीय अध्यक्ष विनीता भावनानी, भारत विकास परिषद पश्चिम क्षेत्र मंत्री प्रफुल्ल गोस्वामी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पूर्व क्षेत्रीय संगठन मंत्री सुरेन्द्र नाइक, भारतीय सिंन्धू सभा महाराष्ट्र प्रदेश सचिव दिनेश दोदानी, कांतीभाई पटेल, ग्वालियरचे राजू बालानी, राज कूल, तपेश शर्मा, रितेश शर्मा आदींची उपस्थिती होती.
यात्रेच्या माध्यमातून राष्ट्राचा गौरव तसेच भारतीय सांस्कृतिक एकतेचे प्रतीक सिन्धू दर्शन महोत्सवाचे आयोजन लेह-लद्दाख स्थित सिन्धू नदीच्या काठी 5 ते 8 जूनदरम्यान भारतीय सिन्धू सभेद्वारा करण्यात आले आहे. यात्रेचा समारोप जम्मू मार्गापासून 11 जून रोजी व चंडीगढ़ मार्गावरून 12 जूनला होईल.







