जळगावात लग्नाच्या आमिषाने व बंदुकीच्या धाकावर महिलेवर अत्याचार

0

In Jalgaon, a woman was raped at the point of marriage with the lure of marriage जळगाव : लग्न करण्याच्या आमिषाने व प्रसंगी बंदुकीचा धाक दाखवून 32 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी गुरुवार, 6 जून रोजी दुपारी 12 वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
32 वर्षीय पीडीता आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. या महिलेची संशयीत भूमेश बापू निंबाळकर (26, रा.अयोध्या नगर, जळगाव), या तरुणाशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार करण्यात आला व नाजूक संबंधाचे व्हिडीओ देखील काढण्यात आले त्यानंतर भुमेशने महिलेला लग्नास नकार दिला. त्यामुळे महिलेने संबंध तोडले होते. असे असतांना भुमेशने महिलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. ही घटना 21 मे 2021 ते 25 मे 2024 दरम्यानच्या काळात घडली.

शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल
हा प्रकार सहन न झाल्याने पिडीत महिलेने अखेर शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरूवार, 6 जून रोजी दुपारी 12 वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भुमेश बापू निंबाळकर (26, रा.अयोध्या नगर, जळगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.


कॉपी करू नका.