पाचोर्यातील विमा एजंटची साडेनऊ लाखात फसवणूक : दोघे आरोपी जाळ्यात

Fraud of insurance agent in Pachora for 9.5 lakhs: Two accused in jail जळगाव : पाचोरा शहरातील विमा एजंटची सात महिन्यांपूर्वी ऑनलाईन फसवणूक झाली होती. याप्रकरणी 10 फेब्रुवारी 2024 रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात सायबर पोलिसांनी गुरुवार, 6 जून रोजी दुपारी एक वाजता सुरत येथून दोन संशयितांना अटक केली. अल्पेश कांतीभाई कोयाणी (39, रा.ग्लोबल सिटी, सुरत) व संजय भुपतभाई चोपडा (32, रा.आंबोली, वरियात रोड, सुरत) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
असे आहे फसवणूक प्रकरण
राजेश प्रदीपकुमार संचेती (39, रा.जामनेर रोड, पाचोरा) यांना ऑनलाईन वेब पोर्टलमधून ट्रेंडिंगमध्ये पैसे गुंतवण्याचे आमिष देऊन 9 लाख 54 हजार रुपयांची फसवणूक केली होती. 14 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2023 च्या दरम्यान फिर्यादींच्या मोबाईल क्रमांकावर, व्हॉट्सअॅपवर जेपी मॉर्गन नावाच्या वेब पोर्टल व व्हॉट्सअॅप ग्रुपवरून ट्रेंडिंगमध्ये पैसे गुंतवणूक करण्यास सांगून फिर्यादी यांना सांगितलेल्या वेगवेगळ्या बँकेच्या खात्यामध्ये फिर्यादी यांचे पत्नीच्या नावावर असलेल्या दोन बँक खात्यात संशयित आरोपींनी 9 लाख 54 हजार रुपये ऑनलाईन रक्कम संशयित आरोपींनी स्वीकारली होती. मात्र त्यामध्ये कुठलाही फायदा झाला नाही, फसवणूक झाली असे लक्षात येताच फिर्यादी राजेश संचेती यांनी सायबर पोलीस स्टेशनला धाव घेऊन 10 फेब्रुवारी 2024 रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अज्ञात संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल होता.