खासदार खडसेंच्या शपथविधी सोहळ्याला नाथाभाऊंची राहणार उपस्थिती

0

मुक्ताईनगर : रावेरच्या लोकसभेतून सलग तिसर्‍यां निवडून आलेल्या खासदार रक्षाताई खडसे यांना केंद्रीय मंत्री मंडळात स्थान मिळाले असून त्यांचा रविवारी सायंकाळी शपथविधी होत आहे. खान्देशवासीयांसाठी ही बाब गौरवास्पद असून या सोहळ्यासाठी त्यांचे सासरे व माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे उपस्थित राहणार आहेत. खासदार खडसेंना मंत्री पद मिळत असल्याने आपल्याला आनंदअश्रू आवरले जात नसल्याची प्रतिक्रिया आमदार खडसे यांनी दिली आहे.

विजयाची तिसर्‍यांदा हॅट्रीक
खासदार रक्षा खडसे यांनी सलग तिसर्‍यांदा खासदार म्हणून विजय मिळवला आहे. खासदार खडसेंना केंद्रीय मंत्री पदाची संधी मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती व ती खरी ठरली आहे. विजयाची हॅटट्रीक साधणार्‍या राज्यातील एकमेव महिला नेत्या असून ओबीसी समुदायाच्या असल्याने त्यांच्या नावाला पसंती दिल्याचं बोललं जात आहे.

पक्ष निष्ठेचे मिळाले फळ : आमदार खडसे
रक्षा खडसे यांना मंत्री पदासाठी फोन आल्यानंतर त्या प्रायव्हेट विमानाने कुटुंबासह दिल्लीकडे रवाना झाल्या आहेत. आता खासदार रक्षा खडसे यांना मंत्री पद मिळाल्यानंतर एकनाथ खडसे यांना आनंद झाला आहे. परिवारातील एक सदस्य केंद्रातील मंत्री मंडळात जातोय याचा आनंद गगनाला भिडनारा आहे. त्या केंद्रात मंत्री मंडळाची शपथ घेणार असल्याने माझे हृदय भरून आले आहे. त्यांनी भाजपमध्ये आणि पक्षश्रेष्ठींवर निष्ठा ठेवली त्याचे हे फळ मिळाले आहे. माझ्याकडे आज बोलायला शब्द नाही मन भरुन आले, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.


कॉपी करू नका.