चाळीसगावात दुरांतो एक्सप्रेसखाली प्रेमी युगूलाची उडी

बोढरेच्या तरुणीचा मृत्यू तर तरुण गंभीर जखमी : धुळ्यात उपचार

0

चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील बोढरे येथील प्रेमी युगूलाने रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक दोनवर मध्यरात्री मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेसखाली उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचे दोन्ही पाय कापले गेले आहेत. गंभीर जखमी तरुणावर धुळ्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.तरुणीच्या मृत्यू प्रकरणी चाळीसगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मृत तरुणीचे नाव शीतल रामसिंग चव्हाण (20, बोढरे, ता.चाळीसगाव) तर जखमी तरुणाचे नाव सचिन सुगम चव्हाण (24, रा.बोढरे) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

तरुणीचा जागीच मृत्यू
चाळीसगाव रेल्वे स्थानकावर डाऊन प्लॉट क्रमांक 2 वर शुक्रवार, 7 रोजी रात्री 1.10 वाजेपूर्वी मुंबईकडून नागपूरकडे जाणार्‍या दुरांतो एक्सप्रेससमोर प्रेमीयुगलने उडी मारली. त्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला तर तरुण गंभीर जखमी झाला. दोघांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेतल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्‍यांनी जखमी तरुणीस तपासून मृत घोषीत केले तर गंभीर जखमी झालेल्या तरुणास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात करण्यात आले. मृत तरुणीचे नाव शीतल रामसिंग चव्हाण (20, रा.बोढरे, ता.चाळीसगाव) तर जखमी तरुणाचे नाव सचिन सुगम चव्हाण (24, रा.बोढरे) आहे.

याप्रकरणी स्टेशन मास्तर चाळीसगाव यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव लोहमार्ग पोलीस ठाण्यात तरुणीच्या मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक किसन राख यांच्या मार्गदशनाखाली हवालदार गोपालकृष्ण सोनवणे करीत आहेत.


कॉपी करू नका.