जम्मूकाश्मीरमध्ये बसवर दहशतवाद्यांचा हल्ला : दहा भाविकांचा मृत्यू

0

जम्मू : नवी दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि नवीन मंत्री मंडळाच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान जम्मूतील रियासी जिल्ह्यातील कांडा भागात भाविकांना नेणार्‍या बसवर दहशतवादी हल्ला झाला असून त्यात दहा जणांचा मृत्यू ओढवला. अनेक जण जखमी झाले आहेत.

गोळीबारानंतर बस कोसळली खड्ड्यात
रियासीचे एसएसपी मोहिता शर्मा म्हणाले की, शिव खोडीहून कटरा येथे जाणार्‍या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यामध्ये चालक जखमी झाला आणि त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. यामुळे बस खड्ड्यात पडली. 10 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 33 जण जखमी झाले. बसमधील इतर प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. प्रवाशांची ओळख पटलेली नाही. प्रवासी हे स्थानिक नसून बाहेरून आलेले आहेत. शिव खोडी मंदिर हे माता वैष्णो देवीचे बेस कॅम्प आहे. सुरक्षा दलांनी तो सुरक्षित करून परिसर आपल्या ताब्यात घेतला आहे.


कॉपी करू नका.