मी नरेंद्र मोदी…. शपथ घेतो की…. : तिसर्‍यांदा पंतप्रधान पदाची शपथ


PM Narendra Modi नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनात झाललेया दैदिप्यमान सोहळ्यात देशाच्या पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी तिसर्‍यांदा शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींना गोपनीयतेची शपथ दिली. विशेष म्हणजे यावेळी नरेंद्र मोदींसोबतच 69 खासदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली. ऐतिहासीक सोहळ्याला साक्षीदार म्हणून शेजारील देशांच्या प्रमुखांसह हजारो मोदी समर्थक उपस्थित होते.

30 कॅबीनेट मंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन मंत्री मंडळात 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मंत्री मंडळात 27 ओबीसी, 10 एससी, 5 एसटी, 5 अल्पसंख्याक मंत्री असतील.

देश-विदेशातील अतिथींची उपस्थिती
ऐतिहासीक सोहळ्याला मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ, बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे उपस्थित होते.

देश विकासाच्या उंचीवर पोहोचेल ः नितीश कुमार
माननीय पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल आणि बिहारच्या विकासाला पूर्ण सहकार्य मिळेल, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधानांच्या अभिनंदनप्रसंगी सांगितले. सलग तिसर्‍यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबद्दल नरेंद्र मोदींचे त्यांनी अभिनंदन केले.


कॉपी करू नका.