जाणून घ्या पंतप्रधानांचे मंत्री मंडळ : कॅबिनेट मंत्री तर राज्यमंत्री

0

नवी दिल्ली : राष्ट्रपती भवनातील ऐतिहासीक शपथविधी सोहळ्यात सलग तिसर्‍यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी 72 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 31 कॅबिनेट, 5 स्वतंत्र प्रभार आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

39 चेहर्‍यांची पुनरावृत्ती
राजनाथ सिंह, अमित शाह, नितीन गडकरींसह शिवराजसिंह चौहान आणि जेपी नड्डा हे दोन नवे दिग्गज टॉप-5 मंत्र्यांमध्ये सामील झाले. 33 नव्या चेहर्‍यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून 39 चेहर्‍यांची पुनरावृत्ती झाली. अनुराग ठाकूर आणि स्मृती इराणींसह 33 जुन्या मंत्र्यांना हटवण्यात आले. 2019 मध्ये 21 नवीन चेहर्‍यांनी शपथ घेतली होती. 36 जणांना दुसर्‍यांदा संधी मिळाली होती. 240 जागा मिळवलेल्या भाजपतील 64 खासदार, 16 जागांच्या टीडीपीतील दोन आणि 12 जागा असलेल्या जेडीयूच्या दोन खासदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळात पहिल्यांदाच एकूण 53 जागा असलेल्या 14 मित्रपक्षांच्या 11 खासदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. पूर्वी मित्र पक्षांचे तीन आणि 2014 मध्ये 5 मंत्री होते. यूपीमधून सर्वाधिक 10 आणि बिहारमधून 8 मंत्री झाले. नियमानुसार मोदी एकूण 81 जणांना मंत्री करू शकतात.

राज्यमंत्री : 35 राज्यमंत्री, पैकी 32 भाजप अन् मित्रपक्षांचे 4
जतीन प्रसाद, भाजप यूपी
श्रीपाद नाईक, भाजप गोवा
पंकज चौधरी, भाजप यूपी
कृष्णपाल गुर्जर, भाजप हरियाणा
रामदास आठवले, रिपाइं महाराष्ट्र
रामनाथ ठाकूर, जदयू बिहार
नित्यानंद राय, भाजप बिहार
अनुप्रिया पटेल, अपनादल यूपी 4
व्ही. सोमण्णा भाजप कर्नाटक
चंद्रशेखर पेम्मासामी, टीडीपी आंध्र
एस. पी. सिंह बघेल, भाजप यूपी
शोभा करंदराजे, भाजप कर्नाटक
कीर्तिवर्धन सिंह, भाजप यूपी
बी. एल. वर्मा, भाजप यूपी
शांतनू ठाकूर, भाजप पश्चिम बंगाल
सुरेश गोपी, भाजप केरळ
डॉ. एल. मुरुगन, भाजप तामिळनाडू
अजय टम्टा, भाजप उत्तराखंड
बंदी संजय कुमार, भाजप तेलंगण
कमलेश पासवान, भाजप यूपी
भागीरथ चौधरी, भाजप राजस्थान
सतीशचंद्र दुबे, भाजप बिहार
संजय सेठ, भाजप झारखंड
रवनीतसिंह बिट्टू, भाजप पंजाब
दुर्गादास उईके, भाजप मध्य प्रदेश
रक्षा खडसे, भाजप महाराष्ट्र
सावित्री ठाकूर, भाजप मध्य प्रदेश
सुकांत मुजूमदार, भाजप पश्चिम बंगाल
तोखन साहू, भाजप छत्तीसगड
राजभूषण चौधरी भाजप बिहार
भूपती राजू एस.वर्मा, भाजप आंध्र
हर्ष मेहरोत्रा, भाजप दिल्ली
निमुबेन भांबनिया, भाजप गुजरात
मुरलीधर मोहोळ, भाजप महाराष्ट्र
जॉर्ज कुरियन, भाजप केरळ
पवित्र मार्गेटा, भाजप आसाम
स्वतंत्र प्रभार : 3 भाजप व 2 मित्र पक्षांचे
राव इंद्रजित सिंह, भाजप हरियाणा
डॉ. जितेंद्र सिंह, भाजप जम्मू-काश्मीर
अर्जुनराम मेघवाल, भाजप राजस्थान
प्रतापराव जाधव, शिवसेना महाराष्ट्र
जयंत चौधरी, रालोद यूपी

30 कॅबिनेट मंत्री : भाजपचे 25, तर मित्रपक्षांतून पाच

राजनाथ सिंह, भाजप यूपी
अमित शाह, भाजप गुजरात
नितीन गडकरी, भाजप महाराष्ट्र
जे. पी. नड्डा, भाजप गुजरात
शिवराजसिंह चौहान, भाजप मध्यप्रदेश
निर्मला सीतारमण, भाजप कर्नाटक
एस. जयशंकर, भाजप गुजरात
मनोहरलाल खट्टर, भाजप हरियाणा
एच. डी. कुमारस्वामी, जेडीएस कर्नाटक
पीयूष गोयल, भाजप महाराष्ट्र
धर्मेंद्र प्रधान, भाजप
जितनराम मांझी हम, बिहार
राजीव रंजन सिंह, जदयू बिहार
सर्वानंद सोनोवाल, भाजप आसाम
डॉ. वीरेंद्र कुमार, भाजप मध्य प्रदेश
राममोहन नायडू, टीडीपी आंध्र प्रदेश
प्रल्हाद जोशी, भाजप कर्नाटक
जुएल ओरांव, भाजप ओडिशा
गिरिराज सिंह, भाजप बिहार
अश्विनी वैष्णव, भाजप ओडिशा
ज्योतिरादित्य सिंधिया, भाजप मध्यप्रदेश
भूपेंद्र यादव, भाजप राजस्थान
गजेंद्र शेखावत, भाजप राजस्थान
अन्नपूर्णा देवी, भाजप झारखंड
किरण रिजिजू, भाजप अरुणाचल
हरदीपसिंह पुरी, भाजप यूपी
डॉ. मनसुख मांडविय, भाजप गुजरात
जी. किशन रेड्डी, भाजप तेलंगण
चिराग पासवान, लोजप बिहार
सी. आर. पाटील, भाजप गुजरात


कॉपी करू नका.