पत्नीला पळवले म्हणून तरुणावर चाकूचे वार करीत प्राणघातक हल्ला : मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

0

मुक्ताईनगर : संशयीतासोबत पत्नी पळून गेल्याच्या रागातून संतप्त पतीने हलखेडा येथे एकावर चाकूने वार करीत प्राणघातक हल्ला केला. ही घटना 8 जून रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. याप्रकरणी पतीविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे नेमके प्रकरण
परशूराम संतोष पवार (लालगोटा, ता.मुक्ताईनगर) यांच्या तक्रारीनुसार, संशयीत राहुल लवंग चव्हाण (लालगोटा, ता.मुक्ताईनगर) याची पत्नी नांदुरी ही रोहिदास राठोड (जोंधनखेडा, ता.मुक्ताईनगर) सोबत पळून गेल्याच्या रागातून संशयीत राहुल चव्हाण याने शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चाकूने रोहिदासच्या गळ्यावर हल्ला केला. या घटनेनंतर पोलीस उपअधीक्षक राजकुमार शिंदे, पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी भेट दिली. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.


कॉपी करू नका.