खासदार रक्षाताईंची केंद्रीय मंत्रीपदी निवड : भुसावळात भाजपा पदाधिकार्यांनी केला जल्लोष
भुसावळ : भुसावळातील सुरभी नगरातील आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर भाजपा पदाधिकार्यांनी फटाके फोडून व पेढू वाटून जल्लोष केला. यावेळी शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण मोठ्या स्क्रीनवर करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी आमदार संजय सावकारे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस परिक्षीत बर्हाटे, जिल्हा चिटणीस खुशाल जोशी, शहराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक मनोज बियाणी, राजेंद्र नाटकर, राजेंद्र आवटे, निर्मल कोठारी, देवेंद्र वाणी, निक्की बत्रा, गिरीश महाजन, किरण कोलते, प्रमोद नेमाडे, बापू महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, संतोष दाढी चौधरी, भाजपा सरचिटणीस संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, रजनी सावकारे, शैलेजा पाटील, महिला शहराध्यक्ष अनिता आंबेकर, पल्लवी वारके, नीळकंठ भारंबे, गौरव आवटे, प्रवीण इखणकर, प्रमोद पाटील, आनंद ठाकरे, सदानंद उन्हाळे, राजू खरारे, राहुल तायडे, प्रमोद पाटील, धनराज बाविस्कर, रवी ढगे, गुड्डू अग्रवाल, नितीन धांडे, नारायण रणधीर, बिसन गोहर, प्रा.विलास अवचार, नंदकिशोर बडगुजर, प्रशांत भट, गोलू राणे, कोमल पाटील, कुणाल येवले, चेतन सावकारे, गोपी राजपूत, दर्शन चिंचोले, रवींद्र दाभाडे, सागर अग्रवाल आदींची उपस्थिती होती.
बोदवड शहरात कार्यकर्त्यांचा जल्लोष
बोदवड : रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना केंद्रात मंत्री पद मिळाल्यानंतर स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. शहरातील गांधी चौकात थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले. ज्येष्ठ स्वयंसेवक अनंत कुलकर्णी,, तालुकाध्यक्ष मधुकर राणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, नगरसेवक विजय बडगुजर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.