रक्षाताईंची राज्यमंत्रीपदी निवड : मुक्ताईनगरात कार्यकर्त्यांचा जल्लोष

आमदार एकनाथराव खडसे म्हणाले : एकनिष्ठतेचे फळ मिळाले

0

मुक्ताईनगर : सलग तिसर्‍यांदा खासदारपदी विजयी झालेल्या रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्री मंडळात वर्णी लागल्यानंतर मुक्ताईनगरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व बुंदीचे लाडू वाटप करून जल्लोष केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा दिल्ली येथे रविवारी सायंकाळी पार पडला. या सोहळ्यात मंत्री पदाची शपथ खासदार रक्षा खडसे यांनी घेतल्यानंतर मुक्ताईनगर शहर व तालुक्यात पदाधिकार्‍यांनी जल्लोष केला.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी संदीप देशमुख, बाळा भालशंकर, सचिन पाटील, प्रवीण पाटील, राजू कपले, संजय कोळी, अजेय महाराज, योगेश राणे, रोहित जंगले, सुनील पाटील आदींची उपस्थिती होती.

पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने मिळाले फळ : आमदार एकनाथराव खडसे
आमदार एकनाथराव खडसे म्हणाले की, आयुष्यात आतापर्यंत आलेल्या आनंदाच्या क्षणातील आजचा क्षण हा महत्त्वाचा आहे. आनंदाचे अश्रू आवरले जात नाहीत. पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने तसेच अनेक वर्ष केलेल्या कामाचे हे फळ आहे. मंत्रीपद मिळाल्याने आपल्या भागातील राज्यातील तसेच देशातील विविध भागांमध्ये रक्षा खडसे यांचे योगदान असेल. आमचे परिवाराचे आशीर्वाद रक्षा खडसे यांच्या पाठीशी आहेत.


कॉपी करू नका.