रावेरात रक्षाताईंनी मंत्री पदाची शपथ घेताच भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

0

रावेर : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळाचा शपथविधीप्रसंगी खासदार रक्षा खडसे यांना मंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर रावेर शहरातील भाजपाच्या पदाधिकार्‍यांकडून फटाके फोडून व ढोल ताशे वाजवून जल्लोष करण्यात आला. शपथविधी सोहळ्याचे मोठ्या स्क्रीनवर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत महाजन, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष रंजना पाटील, पंचायतराज ग्रामविकास जिल्हा संयोजक सुनील पाटील, तालुकाध्यक्ष महेश चौधरी, माजी तालुकाध्यक्ष राजन लासूरकर, धनगर समाजाचे युवा नेते संदीप सावळे, तालुका सरचिटणीस चंदू पाटील, पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, डॉ.कुंदन फेगडे, महेश पाटील, राहुल पाटील (केर्‍हाळा), दुर्गादास पाटील, रवींद्र पाटील, राहुल महाजन, चेतन पाटील, उमाकांत महाजन, राजेंद्र चौधरी, संजय पाटील, पी.के.महाजन, नितीन पाटील संजय पाटील आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

रावेर मतदारसंघाचा सन्मान
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून खासदार रक्षा खडसे यांना मंत्री पदासाठी मिळालेली संधी ही रावेर लोकसभेतील संपूर्ण मतदारांचा सन्मान असल्याचे प्रतिपादन जि.प.चे माजी उपाध्यक्ष तथा लोकसभा निवडणूक प्रमुख नंदकिशोर महाजन यांनी केले.


कॉपी करू नका.