दहा हजारांची लाच भोवली : निंभोरा पोलीस ठाण्यातील फौजदार जळगाव एसीबीच्या जाळ्यात

Bribe of 10,000: Faujdar of Nimbhora Police Station in the net of Jalgaon ACB भुसावळ : गुटखा प्रकरणात इर्टीगा वाहन जप्त केल्यानंतर ते न्यायालयाने सोडण्याचे आदेश यंत्रणेला दिले मात्र वाहन सोडण्यासाठी सुरूवातीला 15 हजार व तडजोडीअंती दहा हजार रुपये मागणार्या निंभोरा, ता.रावेर पोलीस ठाण्यातील फौजदाराला जळगाव एसीबीने अटक केली. ही कारवाई बुधवार, 12 मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास निंभोर्यातील मरिमाता मंदिराजवळ करण्यात आली. कैलास विश्वनाथ ठाकूर (56, रा.निंभोरा, ता.रावेर) असे अटकेतील फौजदाराचे नाव आहे. या कारवाईने पोलीस दलातील लाचखोरांमध्ये खळबळ उडाली आहे.
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एन.एन.जाधव यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.


