भुसावळात हॉटेलवर हाणामारी : डोक्यात फोडली बिअरची बाटली


A scuffle at a hotel in Bhusawal : A beer bottle was smashed on the head भुसावळ : शिवपूर कन्हाळा रोडवरील जलसा हॉटेलवर वाद होऊन एकाच्या डोक्यावर बिअरची बाटली मारून दुखापत करण्यात आली. ही घटना शुक्रवार, 14 जून रोजी दुपारी 4.30 वाजता घडली. व रात्री तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवपूर कन्हाळा रोडवरील जलसा हॉटेलवर शुक्रवारी दुपारी वाद झाले. यात यशवंत गुणवंत पाटील (रा.शिवपूर कन्हाळा, ता. भुसावळ) व त्याच्या सोबतच्या अनोळखी तिघांनी गजानन रतन घुले (रा. शिवपूर कन्हाळा) व घुले यांचा भाचा प्रवीण संजय जयकर (रा. मुक्ताईनगर) यांच्याशी वाद घातला. यावेळी यशवंत यांनी प्रवीण जयकर यांच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडण्यात आली. याप्रकरणी गजानन घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यशवंत पाटील व त्यांच्या सोबतच्या तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक बबन जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास गणेश राठोड करीत आहे.


कॉपी करू नका.