किनगाव-डांभूर्णी रस्त्यावरील शेतातून 21 खांबावरील लघू दाबाचा तार चोरीला


A short tension wire on 21 poles was stolen from a farm on Kingaon-Dambhurni road यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथून डांभूर्णी जाणार्‍या रस्त्यावरील शेतातून तब्बल 21 खांबावरील लघू दाबाचा विद्युत तार चोरीला गेला. हा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. तार चोरीमुळे या भागातील तब्बल 38 शेतकर्‍यांचा विद्युत पुरवठा देखील खंडीत झाला. पिकाला पाणी देणे जिकरीचे झाले आहे. तार चोरी करणारी टोळीच सक्रिय असावी, असा संशय शेतकर्‍यांना आहे.

अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार
किनगाव, ता.यावल या गावातून डांभूर्णी जाणार्‍या रस्त्यावर सुभाष नेहेते यांचे शेत आहे. या शेताजवळील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रोहित्रापासून ते थेट मनोज महाजन यांच्या शेतापर्यंत तब्बल 21 खांब आहे व त्यावर लघू दाबाचे तार टाकून या भागातील 38 शेतकर्‍यांना शेती पंपाकरीता विद्युत कनेक्शन देण्यात आले आहेत या शेतातील 21 खांबावरील लघू दाबाचे तार मध्यरात्री नंतर अज्ञात चोरट्यांनी चोरी केले. हा प्रकार शनिवारी सकाळी शेतकर्‍यांच्या निर्दशनास आला व त्यांनी राज्य विद्युत वितरण कंपनीच्या लाईनमन यांना माहिती दिली. याबाबत यावल पोलिसात तक्रार देण्यात आली.


कॉपी करू नका.