पाडळसा येथील वीट भट्टी परिसरातून अल्पवयीन मुलीस पळवले


यावल : यावल तालुक्यातील पाडळसा गावाच्या शिवारात असलेल्या वीट भट्टी जवळून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने कसले तरी आम्ही दाखवून फुस लावून पळवून नेले. ही घटना गुरुवार, 13 जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात शनिवारी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आमिष दाखवून पळवले
पाडळसा, ता.यावल या गावालगतच्या वीट भट्टीवर विटा थापण्याच्या कामासाठी आलेल्या कुटुंबातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी कसले तरी आमिष दाखवून, फुस लावून पळवून नेले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर प्रारंभी मुलीचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र मुलगी कुठेच मिळून न आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोयुनोद्दीन सय्यद करीत आहे.


कॉपी करू नका.