चाळीसगावात 50 किलो गांजा जप्त : चालकास अटक

चाळीसगाव शहर पोलिसांची कारवाई : गांजा तस्कर हादरले


50 kg ganja seized in Chalisgaon : Driver arrested चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे गांजा विक्री करताना अशोक भरतसिंग पाटील (54, प्लॉट नं.38, शिक्षक कॉलनी, चाळीसगाव) यास अटक केली. संशयीकडून 50 किलो 315 ग्रॅम वजनाचा व सुमारे दहा लाख सहा हजारे तीनशे रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला तसेच 12 लाख रुपये किंमतीचे वाहनही जप्त करण्यात आले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चाळीसगाव निरीक्षक संदीप पाटील यांना संशयीत अशोक पाटील हा वाहनातून गांजा विक्रीसाठी नेणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. शनिवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास शिक्षक कॉलनीत पोलिसांनी छापेमारी करीत संशयीताच्या वाहनातून सुमारे दहा किलो तसेच त्याच्या घरातून 40 किलोवर गांजा जप्त केला. पथकाने संशयीताला ताब्यात घेत वाहनही जप्त केले. या कारवाईने गांजा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहा.पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहर निरीक्षक संदीप पाटील, निवासी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे, फौजदार सुहास आव्हाड, हवालदार सुभाष घोडेस्वार, हवालदार राहुल भीमराव सोनवणे, हवालदार विनोद विठ्ठल भोई, नाईक महेंद्र प्रकाश पाटील, कॉन्स्टेबल आशुतोष दिलीप सोनवणे, कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर हरी पाटोळे, पवन कृष्णा पाटील, विजय रमेश पाटील, ज्ञानेश्वर विलास गीते, मनोज मोरसिंग चव्हाण, राकेश मुरलीधर महाजन, रवींद्र निंबा बच्छे, महिला शिपाई स्नेहल मांडोळे आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड व कॉन्स्टेबल उज्वलकुमार म्हस्के करीत आहेत.


कॉपी करू नका.