भुसावळात सलग दोन दिवस दमदार पावसाची हजेरी


भुसावळ- शहरात शनिवारी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर रविवारीदेखील सकाळपासून पावसाने रीपरीप कायम ठेवल्याने रविवारच्या आठवडे बाजारात आलेल्या ग्राहकांसह भाजीपाला विक्रेत्यांचे चांगलेच हाल झाले. दरम्यान, शहरवासीयांचे खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना चांगलेच हाल होत असताना पालिका प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे.

पावसाने खड्ड्यांमध्ये साचले पाणी
शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान अर्धा तास जोरदार पाऊस झाला. गुरुवारी 16 मिली तर शुक्रवारी 18 मिली पावसाची नोंद करण्यात आली. सायंकाळच्या दमदार पावसानंतर शहरातील वसंत टॉकीज मार्गावरील न्यायाधीश निवासस्थानासमोर पाणी साचले. यासह जामनेर रोडवरील साईजीवन किराणा शॉप, रंगोली हॉटेल, सिंधी कॉलनी परीसर, मान रेसिडेंन्सी भाग आदी ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास सुरभी नगरात संरक्षक भिंत कोसळल्याने पाटीलमळ्याकडे जाण्याचा मार्ग बंद झाल्याने नागरीकांचे चांगलेच हाल झाले.


कॉपी करू नका.